हौसेला नाही मोल : हेलिकॉप्टरमधून आली वधू : सूनबाईच्या स्वागताने अमळनेरकरही भारावले


Housela Nahi Mol: The bride came from a helicopter : Amalnerkar was overwhelmed by the reception of the daughter-in-law अमळनेर : हौसेला मोल नसल्याचा प्रत्यय अमळनेरकरांनी गुरुवारी घेतला.

शहरातील प्रसिध्द बिल्डर व डेव्हलपर सरजूशेट गोकलानी व त्यांच्या परीवाराचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर श्रध्दास्थान आहे. मुलगा आशिष याचा काही दिवसापुर्वी अहमदनगर येथील सीमरनशी विवाह निश्चित झाल्यानंतर शुक्रवार, 10 रोजी हा विवाह येथे होणार आहे. गुरुवार, 9 रोजी साखरपुडा व हळद असल्याने चक्क अहमदनगर येथून हेलिकॉप्टरद्वारे वधूला आणण्यात आले. तत्पूर्वी मंगळग्रह मंदिरावर पुष्पवृप्टी करून आशीर्वादही घेण्यात आले व त्यानंतर सीमरन विवाहस्थळी रवाना झाल्या.







मोठ्या प्रमाणावर उसळली गर्दी
दरम्यान मंदिरावर पुष्पवृष्टी होत असल्याचे पाहून मोठी गर्दीही उसळली होती तर ही बाब पूर्वनियोजित असल्याने अनेकांना माहित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !