भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवले
A minor girl was abducted from Bhusawal भुसावळ : शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी काहीतरी आमिष दाखवून मंगळवारी पळवून नेले. सर्वत्र मुलीचा शोध घेण्यात आला मात्र ती न सापडल्याने या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक वासुदेव कंखरे करीत आहेत.








