सुळेतील शेतकरी तरुणाची आत्महत्या


Sule farmer youth suicide मुक्ताईनगर : तालुक्यातील सुळे येथील 33 वर्षीय शेतकरी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी निदर्शनास आली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. दीपक माणिक लहासे (33, सुळे) असे मयत तरुण शेतकर्‍याचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दीपक यांनी बुधवारी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मयताचा मोठा भाऊ याने मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !