यावलमध्ये विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा


साने गुरूजी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा : 43 वर्षांनी जमले विद्यार्थी

यावल : शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1976 मध्ये शिक्षण घेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना नुकताच मेळावा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच विद्यार्थी दशेतील अनुभव प्रसंगी कथन केले. अध्यक्षस्थानी डॉ.प्रमोद पवार होते.

ऋणानुबंधाची मेळाव्यातून परतफेड
माजी विद्यार्थ्यांनी एकत्रीत यावे व त्या वेळचे आपले अनुभव सध्याच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कथन करावेत जेणेकरून ज्या संस्थेने आपल्याला घडवलं आणि ज्या शाळेमध्ये आपण मोठे झालो अशा मागील ऋणानुबंधाची परतफेड होण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सटाणा येथील रहिवासी व प्रभाकर कोठावदे हे सध्या नाशिक येथे वास्तव्यास असून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी खडतर वाटमधून आपण कसे शिकलो व प्रगतीचे शिखर कसे गाठले याची माहिती दिली. डॉ.प्रमोद पवार (अमळनेर) यांनी सर्व अनुभव कथन केले. या कार्यक्रमात बाळासाहेब कोलते, रवी बावस्कर, राजन महाजन, रवी बोरले यांच्यासह 1976 साली असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गोळा करण्याचे काम दीपक बेहडे, भगतसिंग पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांमधून 40 ते 50 विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

स्वागताने विद्यार्थी भारावले
साने गुरुजी हायस्कूलतर्फे प्राचार्य वाघ यांनी तत्कालीन सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेचे पर्यवेक्षक एम.के.पाटील यांनी साने गुरुजी हायस्कूल ही नगरपालिका संचलित असून शाळा जरी मोठी दिसत असली शासनाकडून अनुदान मिळत नाही, विद्यार्थ्यांच्या अडचणी खूप मोठ्या असून आज विद्यार्थ्यांना बसायला बेंचेस नाही. याबाबत नगरपालिकेकडे स्मरणपत्र देऊन दखल घेतली जात नाही व माजी विद्यार्थ्यांनी जर याबाबत संस्थेकडे मदतीचा हात दिला तर निश्चितच संस्था नावारूपाला येऊ शकेल, आज अठराशेवर विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहे याची जाणीव करून दिली. याप्रसंगी प्रभाकर कोठावदे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा घ्यावा व फुल ना फुलाची पाकळी म्हणून सर्व विद्यार्थी निश्‍चित हातभार लावतील, असा आशावाद व्यक्त केला. याबाबत मुख्याध्यापक वाघ यांनी पुढील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात निश्चितच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात येईल, असे सांगितले. कार्यक्रम प्रसंगी पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याला माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


कॉपी करू नका.