हरीविठ्ठल नगरात धाडसी घरफोडी : 35 हजारांचा ऐवज चोरीला
Daring burglary in Harivithal town: 35 thousand stolen जळगाव : घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी शहरातील हरीविठ्ठल नगरात साधत टी.व्ही., फ्रीजसह सुमारे 35 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी गुरुवारी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
हरीविठ्ठल नगरात कृष्णाबाई भैरूला ओडीया (48) या वास्तव्यास आहेत. 24 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान त्या घर बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून टीव्ही, फ्रीज, गॅसच्या दोन हंड्या, लाकडी कपाट, स्टीलचे भांडे, स्पीकर्स असा एकूण 35 हजारांचा मुद्देमाल लांबवला. गुरुवार, फेब्रुवारी महिला घरी आल्यावर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.








