आपले सरकार असल्याने अडचणी निश्‍चित सुटणार -आमदार सुधीर तांबे


भुसावळ : गेल्या पाच वर्षांमध्ये शिक्षण संस्थांमधील अनेक अडचणी आल्या यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती यासह इतर अडचणींना सामोरे जावे लागले. आता मात्र आपले सरकार असल्याने विविध प्रश्‍न सरकार दरबारी मांडून ते सोडवण्यावर भर असणार आहे. संघटनांनीदेखील संघटन मजबूत केले पाहिजे, असे आवाहन पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांनी केले. दीपनगर येथील शारदा माध्यमिक विद्यालयात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांचा सत्कार व विविध अडचणी सोडवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विनाअनुदानीत संस्थांना अनुदानाची गरज
आमदार तांबे म्हणाले की, शिक्षकांसह विद्यार्थी संख्या व अनुदानाबाबत अनेक तक्रारी आल्या असून शासन 55 हजार कोटी रुपये शिक्षणावर खर्च करते परंतु हे बजेट वाढवणे गरजेचे असून विनाअनुदानित शाळांना अनुदान दिले पाहिजे. कला क्रीडा व इतर शिक्षकेतर कर्मचारी पदे 100 टक्के मंजूर झाली पाहिजेत, कॉम्प्युटर, ग्रंथालय दिले पाहिजे पाहिजे. नवीन आकृतीबंध पुन्हा सुधारीत करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, रीक्त पदे भरली जाणे गरजेचे आहे, असेही आमदार तांबे म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थाध्यक्ष आर.एन.गाजरे, सचिव एस.जी.चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद गाजरे, संस्थेचे संचालक व ईफ्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, शिक्षक परीषदेचे एस.एस.अहिरे, मुख्याध्यापक संघटनेचे अरुण धनपाल, अनिल गुरचळ, शरद पाटील, शिक्षक भरती तालुकाध्यक्ष विलास पाटील, जीवन महाजन, मुख्याध्यापिका सुनंदा पाटील, विज्ञान संघटनेचे सुनील वानखेडे आदी उपस्थित होते. आभार संजय भटकर यांनी मानले.


कॉपी करू नका.