यावलच्या तरुणाची लग्नाच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक : नववधूसह दोघे जाळ्यात


Yaval’s young man was cheated of three and a half lakhs on the pretext of marriage: Two with the bride in the net यावल : शहरातील 33 वर्षीय तरुणाची दलालांच्या मार्फत लग्न लावून देत पाच जणांनी तब्बल तीन लाख 37 हजारात फसवणूक केली होती. या प्रकरणी नववधूसह दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दलालास पाच दिवसांची तर नववधू असलेल्या महिलेस सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

फसवणूक प्रकरणी दाखल आहे गुन्हा
यावल शहरातील रहिवासी बबलू जयप्रकाश गर्गे (33) या तरुणास विवाह करीता काही दलालांनी हेरत नवविवाहितेसह पाच जणांनी तीन लाख 37 हजारात फसवणूक केली होती. या प्रकरणी यावल पोलिसात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथून अशोक सुधाकर जरीवाले (60) तर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून शीला बाळू सोनवणे उर्फ शीला साईनाथ अनर्थे-पाटील (32) या दोघांना अटक करण्यात आली. दोघा संशयीतांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता यातील जरीवाले यांना 13 फेब्रुवारीपर्यंत तर शीला सोनवणे यांना 17 फेब्रुवारीपर्यंत सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !