भुसावळात महामार्गावर अ‍ॅपे रीक्षा पेटली : मेडिकल साहित्य खाक


Auto rickshaw caught fire on the highway in Bhusawal : Medical material Khak भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून भुसावळकडे मेडीकल, पीओपीचे सामान घेऊन येत असलेल्या मालवाहू अ‍ॅपेला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता घडली. या आगीत मेडीकल औषधी जळाली. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

अचानक लागली आग
गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास जळगावकडून येत असलेली अ‍ॅपे रीक्षा (एम.एच.19 बी.एम.1583) यात मेडीकल औषधी, पीओपीचे साहित्य असे घेऊन रीक्षा चालक लतीफ शेख लुकमान हा भुसावळ, फैजपूर व सावदा येथे माल घेऊन जात असताना महामार्गावरील सदगुरू पेट्रोल पंपासमोर रीक्षातील साहित्य पेटल्याने धावपळ उडाली. रीक्षा चालकाने तात्काळ जागेवरच गाडी थांबवित आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने साहित्य मोठ्या प्रमाणावर जळाले. रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांनी सुध्दा थांबून यावेळी मदत केली. याच वेळी तालुका पोलिस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलिस हवालदार वाल्मीक सोनवणे, जगदीश मोरे यांनी घटना पाहून तात्काळ धाव घेतली. रीक्षातील माल हा भुसावळ येथे उतरून रीक्षा चालक फैजपूर व सावदा येथे माल पोहोचण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !