अडावदला बनावट झंडू बामसह आयोडेक्सचा 21 हजारांचा साठा जप्त
21 thousand stocks of Iodex along with fake Zandu Balm seized from Adavad चोपडा : जळगावातील अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे चोपडा तालुक्यातील अडावद येथून जळगावच्या इसमाला बनावट झंडू बाम व आयोडेक्स विक्री करताना पकडले. संशयीताकडून 20 हजार 900 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मनिष चतुर्भुज बजाज (45, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरून जळगाव), असे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अडावद येथे बजाज हा बनावट झंडू बाम आणि आयोडेक्सचा बनावट साठा विक्रीसाठी आल्यानंतर औषध विक्रेत्याने जळगाव औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त डॉ.अनिल माधवराव माणिकराव यांना कल्पना दिल्यानंतर अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलिसांनी गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अडावद गावात मनिष बजाज याला ताब्यात घेतले.






21 हजारांचा साठा जप्त
मनिष बजाजच्या ताब्यातून इमामी लि.कोलकत्ता पश्चीम बंगाल झंडु बाम एकुण नग 250, मॅक्सन हेल्थकेयर प्रा.ललि.आयोडेक्स एकूण नग 230, मॅक्सन हेल्थकेयर प्रा.लि.आयोडेक्स एकूण 30 असा एकूण 20 हजार 900 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी डॉ. अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीवरून मनिष बजाजविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.


