मूकनाट्यातून स्त्रीभ्रूणहत्येसह हुंडाबळीवर प्रहार

युवारंगमध्ये दुसर्‍या दिवशी विद्यार्थ्यांनी गाजवल्या स्पर्धा


In Yuvarang, students played competitions on the next day फैजपूर : सोशल मिडीयाच्या युगात तरुणाई भरकटल्याचा एकीकडे आरोप होत असतानाच ऐतिहासीक नगरीत सुरू असलेल्या सळसळत्या तरुणाईने मात्र हा आरोप खोडून काढत आजची पिढी आजू-बाजूच्या घटनांकडे अत्यंत गंभीरपणे पाहत असल्याचे दाखवून दिले. युवारंगच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी दिवसभरात पाच रंगमंचावर विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. रंगमंच क्रमांक एकवर शनिवारी दिवसभरात सकाळी मूक अभिनय व दुपारनंतर मिमिक्री हे कलाप्रकार सादर करण्यात आले. विद्यार्थी कलावंतांनी शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, बालविवाह, प्रदूषण आदी ज्वलंतर विषयावर मूकनाट्यातून प्रहार करीत लक्ष वेधले.

उपस्थित झाले अंतर्मुख
रंगमंच क्रमांक एकवर मूकनाट्य हा कलाप्रकार सादर करताना कलावंत विद्यार्थ्यांनी मूक अभिनयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयांवर मूकनाट्य सादर केले. त्यात स्त्रियांवरील अत्याचार तसेच शेतकर्‍यांची आत्महत्या, भ्रष्टाचार, मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत, माध्यमांमुळे विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार, शाळा महाविद्यालय अशा विविध ठिकाणी होणार्‍या विविध घटनांवर मूक अभिनयाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.

पाश्चिमात्य गीतांनी आणली रंगत
रंगमंच क्रमांक दोन वर पाश्चिमात्य समूह गायन सादर करण्यात आले. त्यात पाश्चिमात्य समूह गायनसाठी पाच, पाश्चिमात्य सोलो गायनसाठी 12, आणि पाश्चिमात्य वाद्य संगीत यासाठी सहा स्पर्धक संघांनी भाग नोंदविला. एकूण तीन स्पर्धांमध्ये स्पर्धा भरण्यात आली होती. या स्पर्धेत पाश्चिमात्य गीतांच्या माध्यमातून मैफिलीला रंग देण्यात आली वेगवेगळ्या प्रकारचे बॉलिवूड आणि हॉलिवूडचे गाणे या ठिकाणी अत्यंत मधुर आवाजात सादर करण्यात आले.

मातीकलेतून साकारला विविधतेतून नटलेला भारत
रंग क्रमांक पाचवर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. त्यात एक चिकट कला माती कला आणि इन्स्टॉलेशनचा समावेश होता. तीन कला प्रकारांमध्ये चिकट कलेसाठी 35 स्पर्धक संघ, माती कलेसाठी 32 स्पर्धक संघ आणि इन्स्टॉलेशनसाठी 40 स्पर्धक संघांनी भाग नोंदविला. चिकट कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय एकात्मता विविधतेतून म्हटलेला भारत निसर्ग चित्र व्यंगचित्रे अशा विविध प्रकार सादर केले. माती कलेतून मदतीसाठी उगवलेले हात प्रेम संबंध विविध प्रकारच्या मुद्रा शृंगार रस मातृत्व वात्सल्य असे अनेक प्रकारच्या कला मूर्तिमंत उभारून आपल्या कलेचे प्रदर्शन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !