भुसावळातील गौसिया नगरातील दुचाकी लांबवली
The two-wheeler in Gausia town in Bhusawal was extended भुसावळ : शहरातील गौसिया नगरातील कब्रस्थानच्या भिंतीजवळून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
गफ्फार फकिरा पिंजारी (43, काझी प्लॉट, गौसिया नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची दुचाकी (एम.एच.19 बी.एच.6385) ही गौसिया नगरातील कब्रस्थानच्या भिंतीजवळ लावण्यात आली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान संधी साधून ती लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.








