इन्स्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते बनवून बदनामी
Defamation of a young woman by creating a fake account on Instagram जळगाव : जामनेर तालुक्यातील एका गावातील तरुणीच्या नावाने अनोळखीने बनावट खाते तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनोळखीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनोळखीविरोधात गुन्हा
जामनेर तालुक्यातील एका गावातील तरुणीचे अनोळखी व्यक्तीने इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाचा तसेच फोटोचा वापर करत बनावट खाते तयार केले तसेच तरुणीच्या मित्र मैत्रिणींसोबत चॅटींग केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना कळविला. त्यानुसार तरुणीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.








