फुलगाव शिवारात अपघात : चारचाकीच्या धडकेने कर्कीतील विवाहिता जखमी
Accident in Phulgaon Shivar : A married woman from Karki was injured after being hit by a four-wheeler भुसावळ : तालुक्यातील फुलगाव शिवारातील हॉटेल वेस्टर्नसमोर भरधाव चारचाकीने अन्य चारचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कर्की येथील विवाहिता जखमी झाली. हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजता या प्रकरणी धुळ्यातील चारचाकी चालकाविरोधात वरणगाव पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
चालकाविरोधात गुन्हा
केतन प्रकाश महाजन (30, कर्की) यांच्या तक्रारीनुसार, ते पत्नी हर्षदा महाजन यांच्यासह चारचाकी (एम.एच.19 सी.यु.4437) ने जात असताना संशयित चालक गोविंद रामदास मोरे (मोगलाई, धुळे) याने त्याच्या ताब्यातील भरधाव कार (एम.एच.18 बी.सी.3901) चालवून पाठीमागून धडक दिल्याने कारमधील विवाहिता हर्षदा महाजन जखमी झाल्या. या प्रकरणी महाजन यांच्या तक्रारीवरून चारचाकी चालक गोविंद मोरे (धुळे) विरोधात धुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मधुकर भालशंकर करीत आहेत.








