भुसावळात डोक्याला बंदूक लावून मागितली खंडणी : कुविख्यात निखील राजपूतसह चौकडीविरोधात गुन्हा
Ransom demanded with a gun to the head in Bhusawal : Crime against the quartet including the notorious Nikhil Rajput भुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतसह चौकडीने तरुणांना खंडणीसाठी मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार श्रीराम नगरात शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. या प्रकरणी खंडणीसह, आर्म अॅक्ट अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत रात्री उशिरा पसार झाले असून बाजारपेठ पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
खंडणी न दिल्याने डोक्याला लावले पिस्टल
तक्रारदार जय जाधवसह चौघे तरुण श्रीराम नगरातून जात असताना दत्त नगर, हनुमान मंदिराजवळ संशयित निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांनी मारहाण करीत खंडणी मागितली तसेच खिसेदेखील तपासले मात्र पैसे न मिळाल्याने निखील राजपूतने डोक्याला बंदूक लावत कुटुंबासह तक्रारदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून दुचाकीचे नुकसानही करण्यात आले.








