आमदार गुलाबराव पाटलांची मंत्रीपदी वर्णी : यावलमध्ये सेनेचा जल्लोष


यावल : शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री पदी संधी मिळाल्यानंतर व सोमवारी शपथविधी झाल्यानंतर यावल तालुका शिवसेनेच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक दीपक बेहेडे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, माजी तालुका प्रमुख कडू पाटील, शहर संघटक सुनील बारी, तालुका उप संघटक पप्पू जोशी, शहर उप प्रमुख संतोष धोबी, योगेश चौधरी, किरण बारी, अनिल पाटिल, आदिवासी सेल सेना तालुका प्रमुख हुसैन तडवी, युवासेनाचे शहर अधिकारी सागर देवांग, उप प्रमुख सागर बोरसे, विजय पंडित, पिंटू कुंभार, प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


कॉपी करू नका.