जळगाव शहरातील नगरसेविकेला मोबाईलवरून अश्लील शिविगाळ
जळगाव : महिला नगरसेविकेला एकाने मोबाईलवर अश्लील शिविगाळ केल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला मोबाईल धारकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 53 वर्षीय महिला नगरसेविकेला शनिवार, 11 रोजी दुपारी 1.41 वाजता 7972136521 या क्रमांकावरून आलेल्या कॉलधारकाने अश्लील शिविगाळ करीत महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य केले. याशिवाय जीवे ठार करण्याची धमकीेखील दिली. तपास हवालदार ओमप्रकाश सोनी करीत आहेत.








