लग्नाच्या आमिषाने एरंडोल तालुक्यातील तरुणीवर बलात्कार : तरुणाविरोधात गुन्हा
Rape of a young woman in Erandol taluka on the lure of marriage : Crime against the youth एरंडोल : तालुक्यातील एका गावातील 28 वर्षीय तरुणीशी प्रेम असल्याचे सांगून लग्न करण्याच्या आमिषाने वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी विक्की उर्फ मनोहर बापूराव पाटील (28, एरंडोल तालुका) या संशयीताविरोधात कासाोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
लग्नाच्या आमिषाने केला अत्याचार
28 वर्षीय पीडीत तरुणीने कासोदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार. 27 सप्टेंबर 2021, 12 डिसेंबर 2022 व 11 फेब्रुवारी 2023 रोजी संशयित आरोपी विक्की उर्फ मनोहर पाटील याने पीडीतेवर घेऊन प्रेम असल्याचे सांगून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून शारीरीक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर पिडीतेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने शिविगाळ करीत आई-वडीलांना मारुन टाकेल, अशी धमकी दिली तसेच 12 डिसेंबर 2022 रोजी दुपारी पीडीतेला जबरदस्तीने घरी नेत पुन्हा जबरदस्तीने इच्छेविरुध्द शारीरीक संबंध केले. तपास सहा.निरीक्षक निता कायटे करीत आहेत.








