लग्नाच्या आमिषाने मुंबईच्या तरुणीची फसवणूक : नगरदेवळ्याच्या दोघांविरोधात गुन्हा


Deceit Mumbai girl with the lure of marriage : Crime against Nagardevla duo पाचोरा : मुंबई फिल्मसिटीत काम करणार्‍या 29 वर्षीय तरुणीशी लग्नाच्या आमिषाने शारीरीक संबंध ठेवून तिची फसवणूक करण्यात आली शिवाय तरुणी लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी आल्यानंतर नगरदेवळा येथील दोघांनी तिला जातीवाचक शिविगाळ केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
मुंबईतील गोरेगाव भागातील 29 वर्षीय तरुणी फिल्मसिटीत महिला आर्टीस्ट आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील अभिषेक रोकडे या तरुणाने तिला लग्नाचे आमिष देत फसवून तिच्याशी फेब्रुवारी 2021 मध्ये शारीरीक संबंध ठेवले व लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी तरुणी आल्यानंतर संशयित अभिषेक रोकडे व अभिलाषा रोकडे (नगरदेवळा, ता.पाचोरा) यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी रविवार, 12 रोजी सायंकाळी दोघांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा. पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !