व्यापार्‍याची नजर चुकवून दोघा भामट्यांनी पावणेसात लाख लांबवले : धरणगावातील प्रकार


The two Bhamtas, losing sight of the merchant, procrastinate: Dharangaon type धरणगाव : किराणा मालाची विक्री करणार्‍या होलसेल व्यावसायीकाची नजर चुकवून दोघा भामट्यांनी पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घडले. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नजर चुकवून साधली संधी
धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात अनिल कुमार अ‍ॅण्ड हेमराज कंपनी नावाने गुंजन डेडीया यांचे होलसेल दुकान आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजन डेडिया हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी
आल्यानंतर त्यांनी रोकड असलेली पिशवी दुकानाचे एक शटर उघडून आत ठेवली व दुसरे शटर उघडत असतानाच दोन अज्ञात भामट्यांनी दुकानात प्रवेश करीत रोकड असलेली पिशवी घेऊन दुचाकीवर पळ काढला. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्यांच्या तपासात वेगवेगळ्या भागात गेले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी धास्तावले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !