मोबाईल दुकानातून चोरट्यांनी 27 हजारांचा सामान लांबवला
जामनेर : जामनेर शहरातील बीओटी कॉम्प्लेक्समधील इलेक्ट्रीक दुकान फोडून दुकानातून 27 हजार रुपये किंमतीच्या सामानाची चोरी करण्यात आली. याबाबत शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
मध्यरात्रीच्या सुमारास चोरी
शंकर रीजमल चंदनाणी (45, गणपती नगर, जामनेर) हे मोबाईल विक्रीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जामनेर शहरातील बीओटी कॉम्प्लेक्समध्ये मोबाईल विक्री व इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ती वाजेच्या सुमारास सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकावून दुकानातून 20 हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रिक सामान आणि सात हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स मशीन असा 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. रविवारी सायंकाळी सहा वाजता जामनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल चाटे करीत आहे.

