भुसावळातील महाराणा प्रताप विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
ज्ञानज्योतीचे केले आदान-प्रदान : विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
भुसावळ : शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सदिच्छा प्रदान करण्यात आल्या व दहावीच्या विद्यार्थ्यांनी चालवलेला ज्ञानाचा वसा नववीच्या विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांच्यासह संस्थेच्या सचिव उषा पाटील, संस्था सदस्य श्रीधर खणके, भागवत वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते. सुदर्शन वानखेडे, आदित्य नारखेडे, सचिन ठाकरे, अर्जुन मांडे या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांतर्फे श्री सुधीर भोळे यांनी येणार्या काळात परीक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुरेखा चौधरी यांनी तर पाहुण्यांचा परीचय दीपाली पाटील यांनी करून दिला. आभार रजनी चौधरी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रशांत मुळे व शरद तायडे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच इ. 9 वी व 10 वीचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
