भुसावळातील विद्युत इंजिन कारखान्यात 23 रोजी पेन्शन अदालत


भुसावळ- रेल्वेच्या विद्युत इंजिन कारखान्यात (पीओएच) शुक्रवार, 23 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. कारखाना लेखा अधिकारी कार्यालय व उप मुख्य सामग्री प्रबधंक कार्यालय, मध्य रेल्वे भुसावळतर्फे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍यांना अंतिम भुगतान प्राप्तीसंबधी प्रश्नावर विचार विमर्श करण्यासाठी पेन्शन अदालत होत असून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांनी सोमवार, 19 ऑगस्टपर्यंत मुख्य कारखाना प्रबधंक, विद्युत इंजिन कारखाना, मध्य रेल भुसावळ कार्यालयात तीन प्रतीत लेखी म्हणणे मांडाव व या अर्जात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍याचे पूर्ण नाव व पत्ता, सेवानिवृत्तीच्या वेळेस पद,
सेवानिवृत्तीची तारीख, सेवानिवृत्तीचे कारण, तक्रारसंबधी तपशील, बँकेचे नाव व खाते क्रमांक, आएफएस, एमआयसीआर कोडसह, अंतिम वेतन व वेतनमान, पीपीओ क्रमांक, टोकन नंबर व पीएफ नंबर, पॅन व मोबाइल नंबर, आधार क्रमांक देणे बंधनकारक असल्याचे रेल्वे विभागातर्फे कळवण्यात आले आहे.


कॉपी करू नका.