झुरखेड्यातील विवाहिता डंपरच्या धडकेने जागीच ठार
A married woman from Jhurkheda was killed on the spot after being hit by a dumper धरणगाव : नातेवाईकांच्या लग्नाला जाणार्या झुरखेड्यातील विवाहितेचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला तर दुचाकी जखमी झाला. पाळधी येथील गोविंद हॉटेलसमोर महामार्गावर सोमवारी दुपारी हा अपघात घडला. कविता प्रशांत चौधरी (37) असे मयत विवाहितेचे नाव असून दुचाकीस्वार विलास चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत.
लग्नाला जाताना दुर्घटना
पाडळसरे येथील माहेर व झुरखेड्याची रहिवासी असलेल्या 37 वर्षीय विवाहिता कविता प्रशांत चौधरी (37) जळगाव येथील आत्याच्या मुलाच्या लग्नपासाठी गावातील कृषी केंद्र चालक विलास देविदास चौधरी यांच्यासोबत दुचाकीने जळगाव येण्यासाठी सोमवारी निघाल्या असताना पाळधीच्या पुढे गोविंदा हॉटेलसमोर भरधाव वेगाने मागून येणार्या डंपर (जी.जे.03 बी.वाय.6831) ने दोघे जण फेकले गेले तर डंपरचे चाक कविता चौधरी यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय व डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

मयत विवाहितेवर अंत्यसंस्कार
कवितया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मंगळवार, 14 रोजी झुरखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत कविता चौधरी या कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गुर्जर यांच्या कन्या तर पाडळसरेचे पोलीस पाटील उमाकांत पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या पश्चात पती, सत्यम (14) व भूमिका (12) ही दोन मुले असा परीवार आहे.
