चाळीसगावात किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूहल्ला : चौघांविरोधात गुन्हा
Knife attack on youth for minor reason in Chalisgaon : Crime against four चाळीसगाव : शहरातील आठवडे बाजारात तरुणावर किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी चौघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
शहरातील आठवडे बाजारातील अकबर शहा हैदर शहा (28) यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी 6.45 ते 7.20 वाजेच्या सुमारास घराजवळ भंगाराचे शेड बांधल्याच्या कारणावरून अकबर शहा हैदर शहा यांच्यावर संशयीताने चाकुने दोन वेळा वार केला. यात शहा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ शहरातील खासगी दवाखान्यात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी करीम शहा मासूम शहा (43, आठवडे बाजार, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसात राजू भिकन मोरे, हरीष राजू मोरे, मयूर राजू मोरे व शुभांगी राजू मोरे (सर्व रा. आठवडे बाजार, नागदरोड, चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या ढिकले करीत आहे.

