बीडच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे

राज्यातील पाच वरीष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या


Deepa Mudhol-Munde as Collector of Beed मुंबई : औरंगाबाद सीडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांची आता बीडच्या जिल्हाधिकापदी नियुक्ती करण्यात आली असून बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांची औरंगाबाद सीडकोच्या प्रशासकपदी बदली करण्यात आली आहे.  मुधोळ या बुधवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीची चर्चा मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून होती. शेवटी त्यांची बदली मंगळवारी झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने मंगळवारी सायंकाळी राज्यातील सहा उच्चपदस्थ आयएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या

1) अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

2) औरंगाबाद सीडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांची आता बीडच्या जिल्हाधिकापदी नियुक्ती करण्यात आली

3) बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांची औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली

4) मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई विक्रीकर खात्याच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे

5) सिद्धार्थ सालीमथ यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !