यावल कोळवद रस्त्यावर दुचाकी अपघात : 40 वर्षीय इसम गंभीर जखमी
यावल : तालुक्यातील कोळवदकडून यावलकडे येणार्या रस्त्यावर दुचाकी घसरल्याने परसाडे येथील 40 वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगावी हलवण्यात आले.
अपघातात इसम जखमी
यावल-कोळवद रस्त्यावर दुचाकी घेऊन परसाडे येथील सलीम इतबार तडवी (40) हा इसम येत असतान रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका नेपाली भोळे, सुमन राऊत, पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

