पी.एम.किसान योजनेचा लाभाचे आमिष देत डोंगरकठोरा येथील शेतकर्‍याला लाखाचा गंडा


The farmer of Dongarkathora was given lakhs of rupees by giving the benefit of PM Kisan Yojana यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शेतकर्‍याला पी. एम. किसान योजनेचा लाभ सुरू करून देतो सांगत एका अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाईन एक लाखांचा गंडा घातला. ई केवायसीच्या नावाने मोबाईलवर आलेला ओटीपी विचारून त्यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

एक लाखांचा शेतकर्‍याला गंडा
डोंगरकोठारा येथील प्रवीण दिनकर गाजरे यांची पत्नी विद्या प्रवीण गाजरे यांना आतापर्यंत मिळत असलेला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ बंद झाला होता व त्यांना ई केवायसी करावी लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यांनी मोबाईलव्दारे ई केवायसी करण्याकरीता गुगलवर पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक शोधून त्यावर संपर्क केला असता अज्ञात मोबाईल वापरकर्त्याने कस्टमर केअरच्या नावाखाली ई केवायसी करीता 9 रुपये लागतील असे सांगितले. संबंधिताने फोन पेचा नंबर व त्यांना एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर त्याने तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो मला सांगा म्हणजे तुमचे पीएम किसानचे पैसे मिळतील, असे सांगून त्यांच्या खात्यातून पाच वेळा 19 हजार 999 रुपयेप्रमाणे असे एक लाख रूपये त्यांच्या बँक खात्यातून लांबवले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी यावल पोलिस ठाणे गाठले मात्र तक्रारीसाठी त्यांना जळगाव सायबर क्राईमकडे पाठवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !