बरौनी एक्स्प्रेसमधून दिड लाखांचा ऐवज असलेली पर्स लांबवली
A purse containing half a lakh was handed over from Barauni Express भुसावळ : बरोनी एक्स्प्रेसने अहमदाबाद ते भुसावळ असा प्रवास करीत असलेल्या प्रवाशांचा झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी एक लाख 52 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवली.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
रोशन कुमार रमेशचंद्र मालू (52, रा. नेहरू रोड शिवानी, मध्य प्रदेश) हे बरौनी एक्सप्रेसच्या ए-2 डब्यातील सीट 1 वर बसून अहमदाबाद ते भुसावळ असा प्रवास करीत असताना रोशनकुमार मालू यांच्या पत्नी डोक्याखाली लेडीज पर्स घेऊन झोपल्या असता सुरत स्थानक येण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने ती पर्स लांबवली. त्यात 35 हजारांचे सोन्याचे पेंडल, 75 हजार रुपये रोख, 42 हजार रूपयांचा वन प्लस मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड असा एकूण एक लाख 52 हजार रुपयाचा मुद्देमाल होता. लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो सुरत लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.








