सुरत पॅसेंजरमधून 37 हजारांचा ऐवज लांबवला


भुसावळ : भुसावळ-सुरत पॅसेंजरच्या कोच क्रमांक एस 5, बर्थ 71 वरून हाजी शेख जबीर शेख मुनाफ (चिनावल) हे प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्स लांबवली. पर्समध्ये 16 हजारांचा मोबाईल, 12 हजाराचा दुसरा मोबाईल, 10 हजार रुपये रोख असा एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो पुढील तपासासाठी नंदुरबार येथे वर्ग करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !