चिंचोलीतील वयोवृद्धाचा दुचाकी अपघातात मृत्यू


An elderly man in Chincholi died in a two-wheeler accident जळगाव : तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत शिपाई कुसुंबा गावाजवळ घडलेल्या

दुचाकी अपघातात जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान बुधवारी पहाटे सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली. अशोक आनंदा घुगे (65, चिंचोली) असे मयताचे नाव आहे.







उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील अशोक घुगे हे ग्रामपंचायत कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई कर्मचारी असून मंगळवारी ते जळगाव शहरात कामानिमित्ताने दुचाकीने आले व काम आटोपून ते जळगावहून चिंचोलीकडे निघाले असता कुसुंबा गावाजवळ भरधाव येणार्‍या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र बुधवार, 15 फेब्रुवारी रोजी पहाटे सहा सवाजता त्यांची प्राणज्योत मालवली. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परीवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !