सुकळीनजीक अपघात : ट्रकचा दुचाकीला कट लागल्याने चार वर्षीय बालिकेचा मृत्यू


Accident near Sukli : A four-year-old girl died after a truck collided with a two-wheeler मुक्ताईनगर : भरधाव ट्रक चालकाने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जामनेर तालुक्यातील नांद्राहवेली येथील बालिकेचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे मंगळवार, 14 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात वेदिका अमोल तायडे (4, रा.नांद्रा हवेली, ता.जामनेर) ही बालिका ठार झाली तर विजय भरत विसावे (रा.मांडवे, ता.जामनेर) हा तरुण जखमी झाला.

लग्नाला जात असताना कोसळले संकट
नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे बु.॥ येथून इच्छापूरकडे विजय विसावे हा युवक वेदिका या बालिकेसह दुचाकी (एम.एच.19 डी. झेड.9554) ने जात असताना पाठीमागून आलेला ट्रक (आर.जे.जी.ए.8508) ने कट मारल्याने घडलेल्या दुचाकी घसरली व त्यात वेदिका अमोल तायडे ही बालिका ट्रकच्या मागील चाकात आल्याने जागीच ठार झाली तर विजय भरत विसावे हा युवक गंभीर जखमी झाला. मंगळवारी दुपारी दिड वाजता हा अपघात घडला. जखमी विजयची आई मीराबाई भरत विसावे (35, रा.मांडवे बु.॥.) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक गिरधारी लाल मेघवाल (राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !