म्हसावदमध्ये नराधम पित्यानेच केला मुलीचा विनयभंग
In Mhasavad, the murderous father molested the girl जळगाव : बाप-बेटीच्या पवित्र नात्याला कलंक लावण्याचा प्रकार तालुक्यातील म्हसावदमध्ये घडला. अभ्यास करीत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबतच नराधम पित्याने अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पित्याविरोधात पीडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पित्याला अटक करण्यात आली. मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पित्याविरोधात गुन्हा दाखल
म्हसावद येथील एका कुटुंबातील पीडीत अल्पवयीन मुलगी घरात अभ्यास करीत असताना तिची आई घराच्या ओट्यावर झाडझुड करीत असताना संशयीत आरोपी पित्याने मुलीला मागच्या खोलीत नेत तिच्याशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडीतेच्या आईने तक्रार दिल्यावरून आरोपी पित्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करत आहेत.

