आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने रस्त्यांसाठी 25 कोटी मंजूर


25 crores approved for roads due to efforts of MLA Shirish Chaudhary रावेर : विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनच्या नाबार्ड मालिका 28- अर्थसहाय्य अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने 10 फेब्रुवारीच्या परीपत्रकानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मान्यता मिळाली आहे.

पाठपुराव्याला आले यश
या रस्त्याच्या मंजुरीसाठी आमदार चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास विभाग यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील राज्य मार्ग क्रमांक चार वाघोदे बुद्रुक ते कोचूर सावखेडा लोहारा रस्ता हा 11 कोटी 99 लाख रुपये व बामणोद ते रूईखेडा रस्ता (न्हावी बोरखेडा बुद्रुक – तिड्या ते मोहमांडली) साखळी रस्ता 13 कोटी 13 लाख रुपयांच्या निधीसह मंजूर झाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !