मुक्ताईनगर व ऐनपूर महसुल मंडळातील केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ

आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती : प्रति हेक्टरी मिळणार 26 हजार 500 रुपये भरपाई


Benefit of Crop Insurance to Banana Growers in Muktainagar and Ainpur Revenue Circles मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील 49 महसूल मंडळात सलग तीन दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा कमी राहिल्याने जिल्ह्यातील केळीला तापमानाचा फटका बसल्याने केळी उत्पादकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी 26 हजार 500 प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर झाली मात्र मुक्ताईनगर मतदार संघातील ऐनपुर व मुक्ताईनगर महसूल मंडळे भरपाईपासून वंचित ठरल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत होता.

 

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने विमा कंपनीचे प्रतिनिधीची यांची बैठक घेवून या दोघे महसुली मंडळात तापमानाचा पारा घसरल्याची वस्तुस्थिती असताना व वस्तुनिष्ठ पुरावे असताना सदरील दोघे मंडळे का ? अपात्र ठरविण्यात आली घ असा संतप्त सवाल करीत चर्चा केली. विमा कंपनी प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केल्यानंतर व पाठपुराव्याअंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना 7 फेब्रुवारी रोजी मागणी करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची मागणी केली. मतदार संघातील ऐनपुर व मुक्ताईनगर ही दोघे महसुली मंडळे विक विमा कंपनीच्या नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यात आली असल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !