भुसावळात अवैध सावकारीच्या तक्रारी : सहकार विभागाची तीन ठिकाणी छापेमारी
Complaints of illegal moneylenders in Bhusawal: Cooperative Department raids at three places भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीने मोठ्या प्रमाणावर डोके काढले असून त्या संदर्भातील तक्रारी सहकार विभागाला मिळाल्यानंतर अधिकार्यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी दिवसभरात शहरात तीन ठिकाणी छापेमारी केली मात्र रात्री उशिरापर्यंत पथकाच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. छापेमारीमुळे मात्र शहरातील अनेक अवैध सावकारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारीनंतर पथकाची छापेमारी
अवैध सावकारी विरूध्द सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभुमीवर सहकार विभागाने दखल घेत बुधवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली. हनुमान नगरातील एका व्यक्तीकडे दिड तास तपासणी करण्यात आली मात्र काहीही आढळले नाही तर शहरातील रजा टॉवर चौकातील व्यापार्याकडेही कागदपत्रांसह रजिस्टर तपासण्यात आले मात्र तेथेही आक्षेपार्ह काहीही आढळले नाही तसेच शहरातील यावल रोडवरील एका डॉक्टरांकडेदेखील पथकाने तपासणी केली मात्र तेथे आढळलेले पाच खरेदी खत सापडले ते त्यांचे व्यक्तीगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.








