विवाहितेसह तरुणीबाबत सोशल मिडीयावर टाकला अश्लील मजकूर
Obscene text posted on social media about a married woman जळगाव : विवाहितेसह तरुणीबाबत फेसबुकवर अश्लिल मजकुर टाकून बदनामी करण्यात आल्याची प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला असून जळगाव सायबर पोलिसात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फेसबुकवर बनवले बनावट खाते
पीडीतेच्या तक्रारीनुसार, 5 ते 14 फेब्रुवारी दरम्यान अज्ञाताने फेसबुकवर गीता पाटील नाव असलेल्या प्रोफाईलवर त्यांची पत्नी आणि भाचीचा यांचा फोटो ठेवला होता. या खात्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत बदनामी कारक अश्लील मजकुर टाकण्यात आला तसेच फेसबुकवरील अश्लिल नाव असलेल्या एका ग्रुपवरदेखील तसाच अश्लिल मजकूर पोस्ट करण्यात आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात फेसबुक खाते धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.








