चाळीसगाव तालुक्यातील तरुणीचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा
molestation of young woman in Chalisgaon taluka : Crime against young man चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील तरुणीचा पाठलाग करून तिला लग्नासाठी आग्रह धरत तिचा विनयभंग करण्यात आला शिवाय लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी देणार्या समाधान संजय पाटील (27, रा.चाळीसगाव तालुका) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन वर्ष तरुणीचा पाठलाग करीत मनस्ताप
25 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी समाधान याने 2021 ते 2023 या कालावधीत माझ्याशी लग्न कर, असे सांगितल्यानंतर त्यास नकार देताच त्याने पाठलाग सुरू करीत शिविगाळ व दमदाटी केली. तरुणीच्या मोबाईलवर टेक्स मॅसेज पाठवून मी तुझ्या शेतात फाशी घेतो व तुझ्यासह कुटुंबातील सर्वांची नावे टाकतो, माझा जगून फायदा नाही तसेच तुझे वडिल शाळेत जातील तेव्हा त्यांना माझ्याकडील मोठ्या वाहनाने अपघात घडवून ठार मारेल, अधी धमकी दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तरुणीचा साखरपुडा झालेल्या नियोजीत वराची माहिती मिळवून त्याच्यासोबत फेसबुकवर चॅटींग करून तरुणीचा विवाह मोडण्याचा प्रयत्न केला. या बदनामीकारक चर्चेसह होत असलेल्या त्रासाला वैतागून तरुणीणे मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजु सांगळे करीत आहेत.








