चाकूच्या धाकावर माजी क्रीडा मंत्र्याचा महिलेवर बलात्कार


Rape case against Shiv Sena leader Uttam Khandare  पुणे : लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे (65, सोलापूर) यांनी बहिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर बिबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकूच्या धाकाने तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग
उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला लग्नाची आमिष दाखवून आणि तिच्या मुलांचा सांभाळ करतो असे भाषण चाकूच्या धाकाने तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक संभोग केला. फिर्यादीने महिलेने नकार दिला असता तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जीवे मारण्याची धमकी
या संबंधातून जन्माला आलेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून उत्तम खंदारे यांनी काही धनादेश फिर्यादी महिलेला दिले होते. परंतु ते धनादेश बँकेत वाटले नाही. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी महिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !