पत्नीचा खून करून पसार झालेला आरोपी 12 वर्षानंतर सावदा पोलिसांच्या जाळ्यात
Accused who killed his wife escaped after 12 years in Savada police net सावदा : पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिचा खून केल्याप्रकरणी तब्बल 12 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सावदा पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश भिवसन उर्फ भूषण भोई (सावदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गुन्हा केल्यानंतर आरोपी पसार
सावदा शहरातील टेलिफोन ऑफिस जवळील झोपडपट्टीत रहिवासी असलेल्या प्रकाशने भोईने 6 जून 2010 रोजी पत्नी सुनीता भोई हिला दारूच्या नशेत मारहाण करीत रॉकेल टाकून पेटवून दिले हाते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पसार झाला होता. संशयित भोईवाड्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सावद्याचे सहा.निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, एएसआय पांडुरंग सपकाळे, यशवंत टहाकळे, अक्षय हिरोळे, उमेश पाटील, मेहरबान तडवी, देवेंद्र पाटील, बबन तडवी, संजय तडवी आदींनी संशयीताला अटक केली.








