चाकूच्या धाकावर दहशत : यावलमध्ये आरोपी जाळ्यात


Terror at knife point : Accused in jail in Yaval यावल : शहरातील सुदर्शन चौकामध्ये 22 वर्षीय तरुण हातात चाकू घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच यावल पोलिसांनी सुदर्शन चौकात जाऊन या 22 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याविरोधात आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. नदीम मोहम्मद ताहेर (22) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

माहिती कळताच पोलिसांची धाव
सुदर्शन चौकात ताज पान सेंटर जवळ हा तरुण आपल्या जवळ एक धारदार चाकू बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यास ताब्यात घेण्यात आले. यावल पोलिसात कर्मचारी गणेश मधुकर ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !