गोरगावले येथे घराला आग : 40 हजारांचे नुकसान


House fire in Gorgaon : Loss of 40 thousand चोपडा : तालुक्यातील गोरगावले खुर्द येथे घराला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने साहित्य जळून सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी अडावद पोलिसात नोंद करण्यात आली. मिराबाई सुकदेव भील (45) या गोरगावले खुर्द येथे वास्तव्यास असून त्यांच्या घराला बुधवार, 15 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली.

40 हजारांचे नुकसान
पाहता पाहता आगीचा विळखा घरात पसरल्याने दुचाकीसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. या आगीत सुमारे 40 हजारांचे नुकसान झाल्याची नोंद अडावद पोलिसात करण्यात आली आहे. तपास हवालदार नसीर बशीर तडवी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !