बक्षीपूरला धाडसी घरफोडी : एक लाख 70 हजारांचा ऐवज चोरीला
Bold house burglary in Bakshipur: One lakh 70 thousand was stolen रावेर : तालुक्यातील बक्षीपूर येथे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत एक लाख 70 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
चंद्रकला यशवंत माळी (45, बक्षीपूर) त्या गावाला गेल्याने 15 ते 16 दरम्यान चोरट्यांनी संधी साधत बंद घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. किचन व बेडरूमधील दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून एक लाखांची रोकड व 70 हजार 935 रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी माळी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.








