बोदवड शहरातील तरुणाची आत्महत्या
Suicide of a young man in Bodwad city बोदवड : शहरातील बाहेरपेठ भागातील 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. हेमंत विनोद बारी (24, बाहेरपेठ, बोदवड) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
हेमंत बारी या तरुणाने गुरुवारी राहत्या घरात पंख्याला साडीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. मयत हेमंत हा कटलरी व्यावसायीक विनोद बारी यांचा मुलगा होय. गत महिन्यातच बारी कुटुंबातील सायली विलास बारी (18) या तरुणीचा दुर्धर आजाराने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तिच्या भावानेही आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.








