जामनेरच्या विवाहितेचा पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
जामनेर : जामनेर शहरातील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने मारहाण करून शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
जामनेर शहरातील माहेर असलेल्या असिया इफ्तेखार देशमुख यांचा विवाह जळगाव शहरातील सलार नगरातील इफ्तेखार साजीद देशमुख यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाल्यानंतर सुरूवातीच्या तीन महिन्यानंतर घरगुती कारणावरून विवाहितेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर फ्रिजचे रिपेरिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावे, अशी मागणी करण्यात आली मात्र माहेरची परीस्थिती प्रतिकुल असल्याने पैसे न आणल्याच्या रागातून पतीसह सासू-सासरे व इतरांनी शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या व त्यांनी जामनेर पोलिसात तक्रार दिली. पती इफ्तेखार साजीद देशमुख, सासू मैदाबी साजिद देशमुख, सासरे साीद तैमूर देशमुख, नणंद सिमरन सादीक शेख, नंदोई भाऊ सादीक नजाकत शेख, मावस सासू शबाना शेख मुख्तार, मावस सासरे मुख्तार शेख समद, जाबीर खलील देशमुख, खलील देशमुख सर्व राहणार सलार नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक अमद मुकेश आमोदकर करीत आहे.

