दुचाकी चोरट्यांचा जळगाव जिल्ह्यात मुक्काम : वाढत्या चोर्यानंतरही पोलिस यंत्रणा सुस्तच
Stay of two-wheeler thieves in Jalgaon district: Despite increasing thefts, the police system remains sluggish जळगाव : जळगाव जिल्ह्यात दररोज दुचाकींच्या चोर्या वाढल्या असतानाच यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय असून दररोज जिल्ह्यात आठ ते दहा दुचाकी दररोज चोरीला जात असल्याने चोरट्यांचा शोध घेण्याची अपेक्षा आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे तरुणाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची बाब उघडकीस आली असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
मयूर रवींद्र सोनवणे (24, रा.धनगरवाडी, म्हसावद ता.जि. जळगाव) यांनी रविवार, 5 फेब्रुवारी रोजी आपली दुचाकी (एम.एच.19 डी.एन.6375) ही त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली असता चोरट्यांनी संधी साधली. अखेर शुक्रवार, 18 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश शिरसाळे करीत आहे.

