यावल शहरातील बुरुज चौकात चारचाकीला भरधाव क्रुझरची धडक


A Speeding Cruiser Collided With A Dour-wheeler at Buruj Chowk in Yaval City यावल : शहरातील बुरूज चौकामध्ये भरधाव वेगाने जाणार्‍या एका क्रुझरने कारला धडक दिल्याने कारचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणाला काही दुखापत झाली नाही. या प्रकरणी यावल पोलिसात क्रुझर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

क्रुझर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर बुरुज चौकामध्ये चिकन मार्केटच्या जवळ रेनाल्डो क्विड कार (क्रमांक एम. एच. 19 सी. यु. 2124) ही घेऊन इकबाल मैताब तडवी (तडवी कॉलनी, यावल) हे येत होते. समोरून भरधाव वेगाने येणार्‍या क्रुझर (क्रमांक एम. एच.19 सी.एफ. 1577) वरील चालकाने कारला चालकाच्या बाजूने धडक दिली. यात वाहनाचे साईड हेडलाईट, बोनट सह बंपर तुटल्याने 20 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !