पाळधीत बंद घर फोडले : 30 हजारांचे दागिणे लंपास
Locked house broken into during surveillance : Jewelery worth 30 thousand stolen
जामनेर : तालुक्यातील पाळधी येथे बंद घर फोडून घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
पुंडलिक रामलाल भुसारी (32, रा. गोविंद महाराज चौक, पाळधी, ता.जामनेर) हे मिस्तरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. 16 फेब्रुवारी रात्री 9.30 वाजता ते जेवण करून घरात झोपले असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील रोकड व दागिने असा एकूण 30 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबविले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी 10 वाजता उघडकीला आला. या संदर्भात पुंडलिक भुसारी यांनी पहुर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.
