भुसावळ स्थानकावर अनोळखीचा मृतदेह आढळला
The body of an unknown person was found at Bhusawal station भुसावळ : रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर शुक्रवारी दुपारी ड्रायव्हर लॉबी पेटी रूमजवळ अंदाजे 45 वर्षाच्या अनोळखी इसमाचे मृतदेह आढळला. अनोळखीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मृतदेह ट्रामा सेंटर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आल्यानंतर लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

