भुसावळातील खळवाडीत तरुणाची आत्महत्या


भुसावळ  : शहरातील जुना सातारा भागातील वेडिमाता मंदिराजवळील खळवाडी भागात 30 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. महेंद्र लक्ष्मण कोळी (30, खळवाडी, वेडिमाता मंदिराजवळ, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
खळवाडी भागातील रहिवासी असलेल्या महेंद्र याने शुक्रवारी सकाळी घरात कुणी नसताना छताला दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मयताच्या चुलत भावाने खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !