सावदा येथे 65 हजारांची घरफोडी


सावदा : शहरातील शिवाजी चौकातील वंजारवाडी भागातील बंद घरातून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर पाहताच केली चोरी
तक्रारदार शरद गिरधर भारंबे (56 सावदा) हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील 20 हजारांची रोकड, 30 हजार रुपये किंमतीच्या सोन्याची पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, 15 हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्यातील कानातले असा एकूण 65 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. बाहेरगावाहून भारंबे आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सावदा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अन्वर तडवी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !